जेऊर बसस्थानकासाठी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर : संजय शिलवंत
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील बस स्थानकासाठी विस्तारीकरण व सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपये मंजूर करावे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जेऊर बस स्थानकासंदर्भात फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे मत शहर प्रमुख संजय शिलवंत यांनी व्यक्त केले.
तसेच या संदर्भात सोलापूरचे विभागीय अभियंता श्रीकांत सूर्यवंशी यांनी जेऊर बस स्थानकाला भेट देऊन प्रस्ताव तयार केला होता, प्रस्ताव तयार करण्यापासून मंजुरी मिळेपर्यंत जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केलेले प्रयत्न सर्व एसटी कर्मचाऱ्यांना माहित आहेत असेही शहर प्रमुख संजय शिलवंत तसेच उपशहर प्रमुख नागेश गुरव यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर या संदर्भात महेश चिवटे, अनिल पाटील यांच्या उपस्थितीत व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी महेश चिवटे यांच्या सादर केलेल्या पत्रावर तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश सोलापूर विभागाचे नियंत्रक भालेराव यांना दिले होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुराव्यामुळे जेऊर स्थानकाला निधी मंजूर झाला आहे, सर्व पत्र व्यवहाराच्या प्रती शिवसेना कार्यालयात आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व प्रश्न मार्गी लागत आहेत, जेऊरच्या बसस्थानकाला बायपास रस्त्याला जोडण्यासाठी प्रस्ताव सुद्धा सादर केलेला आहे,
– महेश चिवटे (शिवसेना जिल्हाप्रमुख)
आम्ही काम करत आहोत, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
करमाळा बस स्थानकासाठी दोन कोटी व जेऊर बस स्थानकासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यासाठी महेश चिवटे यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल आभारी आहोत, येणाऱ्या काळात लोकसभागातून एस टी महामंडळ अजून प्रगतीपथावर नेण्याचे काम करु.
– श्रीकांत सूर्यवंशी (विभागीय अभियंता,एस टी महामंडळ सोलापूर)