नागनाथ तलावाच्या पायऱ्या बांधकामाचे संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न -

नागनाथ तलावाच्या पायऱ्या बांधकामाचे संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

0

करमाळा(दि. 16):मौजे शेटफळ (ता. करमाळा) येथे महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत नागनाथ देवस्थान कल्लोळ तलावावर पायऱ्या बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कामासाठी शासनाकडून रु. ९० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या वेळी चिखलठाण गावचे नेते व माजी सरपंच चंद्रकांतकाका सरडे, माजी जि.प. उपाध्यक्ष राजेंद्रभाऊ बारकुंड, सतीशबापू शेळके, उद्धवदादा माळी, अण्णासाहेब पवार, बेरे सरपंच, मोहम्मद भाई, रोहिदास सातव, अशोक तकीक, उमरडचे माजी सरपंच प्रमोद बदे, वांगी नं. ३ चे सरपंच मयुर रोकडे, सोमनाथ रोकडे, कुगावचे चेअरमन सचिन गावडे, समाधान देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेटफळचे माजी सरपंच विकास गुंड, सध्याचे सरपंच काका गुंड, पांडुरंग लबडे, हभप बापू महाराज, सचिन पोळ, सचिन दिलीप पोळ, शिवसेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड, तुकाराम चोरगे, भाऊसाहेब साबळे, पारस गुंड, बाबुराव चोरगे, विठ्ठल गुंड, सुहास पोळ, बापूराव पोळ, राहुल लबडे, आप्पा लबडे, पिल्लू पोळ यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!