आ.संजयमामा शिंदे यांचा वाढदिवस मुंबईत सोनवणे यांचेवतीने साजरा…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण सोनवणे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त मुंबईत खास सत्कार केला आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त आ. शिंदे मुंबईत होते. ही संधी साधत सोनवणे यांनी त्यांचा ३१ जुलै पूर्वीच वाढदिवस साजरा केला. आ. शिंदे हे वाढदिवस साजरा करीत नसल्याने वाढदिवसादिवशी ते तालुक्यात न थांबता बाहेरगावी जातात.

त्यामुळे सोनवणे यांनी वाढदिवसापूर्वीच मुंबईत आ. शिंदे यांची भेट घेवून शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार केला आहे. यावेळी कात्रजचे उपसरपंच शंकर कवडे, डॉ. राहुल कोळेकर, लव्हेचे सरपंच विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सोनवणे यांनी जिंती, कात्रज, टाकळी, कोंढारचिंचोली, खातगाव, केत्तूर, कोर्टी आदी भागातील रस्ते चांगले करण्याची मागणी केली. त्यास शिंदे यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!