संत रविदास महाराज मंदिर ‘वर्धापनदिन’ उत्साहात साजरा..

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे

कंदर (ता.१०) : अनेक विकाराने ग्रस्त असलेल्या माणसाबरोबर संगत केल्याने त्यांच्यातील विकार आपल्यात ही येतात.यामुळे संगत चांगली झाली नाहीतर मनुष्य पशुप्रमाणे वागतो.म्हणून आपण आपली वागणूक कशी ठेवायची हे ठरविले पाहिजे.छोट्या-मोठ्या गोष्टीवरून मोठ्या अडचणी वाढल्या जाऊ शकतात असे प्रतिपादन संत श्री १०८ दिपगिरी महाराज (पठाणकोट-पंजाब) यांनी केले.

माढा तालुक्यातील भुईंजे येथील संत शिरोमणी श्री संत रविदास महाराज यांच्या मंदिरचा वर्धापनदिन पठाणकोट (पंजाब) येथील जगतगुरु आश्रमाचे प्रमुख संत व बेगमपुरा विद्यापीठाचे चेअरमन संत श्री १०८ दिपगिरी महाराज यांच्या सत्संगाने संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास संत आचार्य गांधारी महाराज,संत रामानंद महाराज,गोपाल अत्री,पारसराम अंगुराजी,बलराज सिद्धू,अश्विनकुमार शास्त्री यांच्यासह पठाणकोट,सचखंड बल्ला-जालंधर,मेरठ (ऊ-प्र),राजस्थान,औरंगाबाद आदी ठिकाणावरून आलेले संत,मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना संत श्री १०८ दिपगिरी महाराज म्हणाले की,तीर्थामध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होते असा लोकांत समज असतो.मात्र मळ पोटात नसतो तर तो मनात असतो.यासाठी मनातील गंदगी काढून टाकली पाहिजे.जो गुरूच्या सानिध्यात येईल.चंदनाच्या जवळ जाईल त्यांचे चंदन झाल्याशिवाय राहणार नाही.यासाठी सर्वांनी आपल्यातील दुर्गुण बाहेर सोडून सत्संगात सामील झाले पाहिजे.

संत रविदास महाराज यांनी ‘अमृतवणीत’ म्हटले आहे की,संगत चांगली ठेवल्यास माणसाचे रूपांतर देवात झाल्याशिवाय राहणार नाही.संतांचा संदेश घरोघर पोहचविला पाहिजे असे ही शेवटी संत श्री १०८ दिपगिरी महाराज यांनी आपल्या सत्संगात सांगितले.
यावेळी सचखंड बल्ला (जालंधर-पंजाब) येथील मनदीपदास महाराज,विक्रमसिंग रविदासिया, रामकुमार आसनावरे-मेरठ,शाहीर रमेश खाडे, यांची ही श्रवणीय मनोगते झाली.औरंगाबाद येथील पूजा पहारे हिने अमृतवणीचे पठण केले.

Yash Shopee ADVT


यावेळी शिक्षण,सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर ट्रष्टचे अध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक राजाभाऊ शिंदे यांनी केले.यामध्ये त्यांनी भुईंजे येथील मंदिरमध्ये सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.संत रविदास महाराज यांच्या आरती नंतर लंगरने (महाप्रसाद) कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी अमृतवाणी पठण, रक्तदान शिबिर,निशाणसाब यांना अंगरखा प्रदान,२६ जणांचे रक्तदान व वधुवर परिचय मेळावा हे कार्यक्रम ही घेण्यात आले.

यावेळी गुरू रविदास क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सेगेकर,राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या माजी अध्यक्षा सुरेखा लांबतुरे,अलका गवळी,चर्मकार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आगावणे,संजय धनशेट्टी,मधुकर गवळी,उद्योजक अविनाश शिंदे,चर्मकार संघटनेचे सुभाष पाटील,प्राचार्य दत्तात्रय बागडे,के.डी.बनसोडे,मारुती मस्तूद,कैलास सातपुते, भानुदास सोनवणे अमित शिंदे,संभाजी वाघमारे,शोभा शिंदे,तनुजा शिंदे,साधना लोखंडे,सरपंच बाळासाहेब जगताप,महादेव जगताप,नवनाथ लोखंडे,डी.जे.राऊत,दत्तात्रय गुजर,हरिदास कांबळे,जे.बी.मधुकर भगत, यांच्यासह पंजाब,राजस्थान,कर्नाटक,पुणे,औरंगाबाद व सोलापूर जिल्ह्यातून आलेले समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन अर्जुन बनसोडे यांनी केले.अमित शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!