वांगी नं.३ येथील संतोष देशमुख यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२५) : वांगी नं.३ (ता.करमाळा) येथील रहिवासी व बागल गटाचे कट्टर समर्थक तसेच मकाई कारखान्याचे माजी संचालक संतोष (बाप्पा) देशमुख (वय ४५) यांचे आज (ता.२५) सकाळी सहाच्या सुमारास ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
संतोष देशमुख हे नेहमी हसतमुख आणि आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे लोकप्रिय होते, वांगी भागात त्यांनी आपले चांगले वलय निर्माण केले होते. त्यांच्या अकाली निधनाने करमाळा तालुक्याच्या राजकीय पटलासह जनसामान्यांतुन हळहळ व्यक्त होत आहे. आज सायंकाळी ४ वाजता वांगी नं ३ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.