सरकार मित्र मंडळ गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी निवडी संपन्न

करमाळा (दि.२५) – येत्या ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून गणेश आगमन होणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुरू आहेत.

करमाळा शहरातील सरकार मित्र मंडळ गणेशोत्सव 2024 च्या अध्यक्ष पदी श्री. सुरज वांगडे यांची तर उपाध्यक्ष पदी श्री. दीपक गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मंडळाची गणेश स्थापना, देखावा, मिरवणूक, विविध कार्यक्रम आदी गोष्टींचे योग्य प्रकारे नियोजन करणार असल्याचे अध्यक्ष श्री वांगडे व उपाध्यक्ष गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. निवड झाल्याबद्दल दोघांचे शहरातून अभिनंदन करण्यात येत आहे.




