दोन वर्षांपासून भूमीअभिलेख कार्यालय दखल घेत नसल्याने सरपडोहचे शिक्षक अरुण चौगुले करणार आमरण उपोषण

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : सरपडोह येथील शिक्षक अरूण चौगुले यांनी भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी २०२१ मध्ये अर्ज देऊनही दखल घेतली जात नसल्याने कंटाळून उद्या १ मार्च पासून उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,
तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख करमाळा यांना १० मार्च २०२१ मी मोजणीसाठी अर्ज दिला. तेव्हापासून मी विविध वेळी मी पाठपुरावा करत आहे. ७ ते ८ वेळा लेखी अर्ज सुद्धा दिलेला आहे आणि फोन वरती अथवा तोंडी विनंती मी दहा-पंधरा वेळा केलेले आहे. परंतु अद्याप पर्यंत दोन वर्षांमध्ये मोजणी ऑफिसने काहीही दखल घेतलेली नाही, म्हणून यांच्या त्रासाला आणि वेळ काढू पनाच्या धोरणाला कंटाळून उद्या १ मार्चपासून मी तालुका भूमी अभिलेख कार्यालय यांच्यासमोर आमरण उपोषण करणार आहे.
मोजणी तात्काळ व्हावी म्हणून अति तातडी चलन फी सुद्धा भरलेली आहे परंतु कुठलीही दखल घेताना कार्यालय दिसत नाही. वरिष्ठ अधिकारी मागील तीन महिन्याखाली करमाळा येथे आले होते. त्यावेळेस त्यांनी भेट घेतली होती. त्यांनी तात्काळ मोजणी करून देतो असे साहेबांच्या समोर मला आणि आमच्या सोबत मोजणी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सांगितले होते परंतु त्यावरही कुठली कारवाई झालेली नाही. त्यामुळे मी उद्यापासून उपोषणास बसणार आहे.