खासदार निधीतून चिखलठाण मधील २ रस्त्यांसाठी २० लाख रुपये मंजूर – सरपंच धनश्री गलांडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – चिखलठाण येथे सिमेंट रस्त्यासाठी खासदार निधीतून नुकतेच २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. चिखलठाण येथील अर्जुन टिंगरे घर ते जिल्हा परिषद शाळा चिखलठाण या दरम्यानच्या सिमेंट रस्त्यासाठी दहा लाख रुपये तसेच सुभाष सुराणा घर ते संजय उंबरे घर या दरम्यानच्या सिमेंट रस्त्यासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत.


हा निधी मिळवून दिल्याबद्दल सरपंच धनश्री विकास गलांडे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आभार व्यक्त केले.

