कंदर येथे विविध सामाजिक उपक्रमाने सरपंच व सदस्यांनी वाढदिवस केला साजरा

कंदर (संदीप कांबळे) – कंदर (ता.करमाळा) येथील लोकनियुक्त सरपंच मौला मुलाणी तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे व दीपक मंजुळे यांचा संयुक्त वाढदिवस गावात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला.

सामाजिक उपक्रम राबविताना गावामध्ये आंबा व नारळ रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर कदम आय केअर व एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय हडपसर यांच्या साह्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
याप्रसंगी उपसरपंच अमर भांगे ग्रामसेवक मधुकर माने माजी उपसरपंच अखलाख जागीरदार माझी तंटामुक्त समिती अध्यक्ष संपत सरडे ग्रामपंचायत प्रतिनिधी रशीद शेख दिलावर शेख सुहास कदम दाऊद मुलाणी शब्बीर मुलाणी हनुमंत खबाले नाना फरतडे अल्पसंख्यांक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शेख बाबुभाई जहागीरदार माजी ग्रामपंचायत सदस्य दिलदार मुलाणी संतोष माने बापू गाडे इंद्रजीत कदम उत्तम लांडगे सुरज नलवडे डॉ.रणजीत कदम डॉ. जावेद मुलाणी डॉ. सागर कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


