करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत जाहीर

करमाळा (दि.२२) – करमाळा तहसील कार्यालयामार्फत सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली. या आरक्षण प्रक्रियेमुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, तसेच महिलांना राजकारणात सक्रिय सहभागासाठी मोठी संधी मिळणार आहे.
अनुसूचित जमाती (महिला) साठी यावेळी कोणतेही आरक्षण नसले तरी इतर गटांसाठी विविध गावे आरक्षित करण्यात आली आहेत.

अनुसूचित जाती गटांतर्गत घारगांव, उमरड, सौंदे, दहीगाव, शेलगांव (वां), मलवडी ही गावे आरक्षित आहेत, तर अनुसूचित जाती महिलांसाठी शेलगांव (क), फिसरे, वाशिंबे, देवळाली / खडकेवाडी, साडे, पाथूर्डी या गावांमध्ये आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग : गुलमरवाडी/भगतवाडी, गोयेगाव,रावगाव, चिखलठाण, भाळवणी, देलवडी राजुरी, रिटेवाडी, मांगी,पोटेगाव,वडाचीवाडी/दिलमेश्वर, गौंडरे आवाटी,जेऊरवाडी ही गावे निवडण्यात आली आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : बिटरगाव (श्री), पोथरे/निलज, पिंपळवाडी, करंजे/भालेवाडी, झरे, निंभोरे घोटी, ढोकरी, कोंढारचिंचोली, मोरवड,आळजापूर, पाडळी कोळगाव, पोफळज,शेटफळ

सर्वसाधारण गट : कावळवाडी, भिलारवाडी, कुंभारगाव/घरतवाडी,दिवेगव्हाण, पारेवाडी, जिंती, कात्रज, टाकळी, खातगाव, कोर्टी/गोरेवाडी/ हुलगेवाडी/ कुस्करवाडी, वंजारवाडी, विहाळ, मांजरगाव, अंजनडोह, खडकी, तरडगाव, बोरगाव, हिवरवाडी, रोशेवाडी, पांडे/खांबेवाडी/धायखिंडी, मिरगव्हाण, हिवरे,अर्जुननगर,सरपडोह, कुंभेज केडगाव, कुगाव, वांगी नंबर १, वांगी नंबर ४/भिवरवाडी, वरकुटे, केम, बिटरगाव (वां), सातोली
सर्वसाधारण महिला – रामवाडी, पोमलवाडी, केतुर, सोगाव, सावडी, लिंबेवाडी, वीट, पोंधवडी, उंदरगाव, जातेगाव, बाळेवाडी, कामोणे, वडगाव उत्तर/वडगाव दक्षिण, भोसे, देवीचामाळ, हिसरे, निमगाव(ह), सालसे, आळसुंदे, नेरले, कोंढेज,वरकटने, जेऊर, लव्हे, वांगी नंबर दोन, वांगी नंबर तीन, पांगरे, वडशिवने, कविटगाव, सांगवी, कंदर, हिंगणी, गुळसडी

ही आरक्षण सोडत पारदर्शकतेने आणि नियमानुसार पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामुळे गावपातळीवर सर्व घटकांना प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध होणार आहे. पुढील पंचवार्षिक काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामाजिक समरसतेचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे.


