करमाळा येथे सरपंच मेळावा संपन्न

करमाळा(दि.२५) : करमाळा पंचायत समिती येथे आज (दि.२५) सरपंच मेळावा पार पडला. या मेळाव्यात करमाळा तालुक्यातील विविध ३० ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये सरपंचांनी आपापल्या ग्रामपंचायतींमधील विविध प्रश्न, काम करताना येणाऱ्या अडचणी, विविध शासकीय योजना आदी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या. तसेच तालुक्यातील कुठल्याही सरपंचांना काही अडचणी आल्यास सर्व सरपंच ऐक होऊन उठाव करणार असल्याचे ठरविण्यात आले. सरपंच संघटना मजबूत करण्यासाठी दर महिन्याला एक मेळावा घेण्याचे देखील मेळाव्यात ठरविले असल्याचे सांगण्यात आले.






