‘भाजपा’ कार्यालयात ‘सावरकर जयंती’ व मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 101 व्या भागाचे प्रसारण करण्यात आले, तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
मन की बात कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा भाग दुसऱ्या शतकाची सुरुवात आहे, गेल्या महिन्यात आपण सर्वांनी त्याचे खास शतक साजरे केले, लोकसहभाग हे या कार्यक्रमाचे सर्वात मोठे बलस्थान आहे. जेव्हा ‘मन की बात’ प्रसारित करण्यात आली, त्यावेळी जगातील विविध देशांमध्ये, वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये, कुठेतरी संध्याकाळ होती तर कुठे रात्र झाली होती, एवढे सगळे असूनही मोठ्या संख्येने लोकांनी वेळ काढून १०० वा भाग ऐकला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी आपण मन की बात मध्ये काशी तमिळ संगमबद्दल बोललो होतो. सौराष्ट्र तमिळ संगमबद्दल काशी तेलुगू संगम देखील काही काळापूर्वी वाराणसीमध्ये झाला होता. पंतप्रधान पुढे म्हणाले की, एक भारत, श्रेष्ठ भारत – युवा संगम या भावनेला बळ देण्यासाठी देशात असाच आणखी एक अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. तरुणाईच्या संगमाचे हे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, माजी शहराध्यक्ष संजय आण्णा घोरपडे, वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे ,वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार ,मकाई सहकारी साखर कारखाने संचालक हरिभाऊ झिंजाडे, आजिनाथ सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक विठ्ठलराव शिंदे , पोथरेचे माजी सरपंच विष्णू रणदिवे ,तात्याराव शिंदे, किरण बागल, वसीम सय्यद, गजू गाडगे, शिवाजी कुंभार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
