उत्तरेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – येथील उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नरखेडकर मॅडम, सौ कुंभार एम.पी ,सौ पी . राऊत,सौ. गाडे मॅडम , सौ.वायभासे मॅडम यांनी केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती प्रशालेतील सहशिक्षिका सौ राऊत पी.के यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली असे प्रतिपादन प्रशालेचे सहशिक्षक जी के जाधव सर यांनी केले.
इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी भाषणे केली तसेच किर्ती दोंड या विद्यार्थिनी ने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी एकांकिका सादर केली. इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वसुंधरा पाटील आणि आकांक्षा कोळेकर या विद्यार्थिनींनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



