करमाळा येथील ६ खेळाडूंची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा येथील ६ धनुर्विद्या खेळणाऱ्या खेळाडूंची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नुकत्याच इंडियन आर्चरी असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा अरण (ता.माढा) येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत करमाळा येथील सह्याद्री ॲकॅडमीचे सर्व स्पर्धकांनी उत्तुंग भरारी घेत यश संपादन केले. यामध्ये वयोगट 13 मध्ये ओम अमोल नरुटे, करण बाळनाथ सरडे,अर्थव अमोल नरुटे, वयोगट 15 मध्ये रिहान अकबर मुलाणी, जयहिंद नारायण जगताप,यश सतीश बाबर या खेळाडूंची निवड अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी झाली.
या खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून सह्याद्री अकॅडमीचे क्रीडा शिक्षक सागर सावंत, अकबर मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.


