चिखलठाण तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बबन सरडे यांची निवड

0

करमाळा (दि.२९) –  चिखलठाण येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बबन महादेव सरडे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात चिखलठाणचे सरपंच सौ धनश्री विकास गलांडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विकास गलांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी सरडे यांचा सत्कार केला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य चव्हाण हेमंत बारकुंड, उपसरपंच योगेश सरडे महादेव सरडे, सुदर्शन पवार तानाजी पवार, धनाजी सरडे, रामचंद्र कळसाईत, वसंत खरात, आबासाहेब मारकड, सुरेश चव्हाण, दिनकर सरडे आदीजन उपस्थित होते.

गावामधील लोकांना आपापसातील भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी मी प्रयत्नशील असणार असल्याचे तंटामुक्तीचे नूतन अध्यक्ष बबन सरडे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!