कुंभेज येथील क्रिकेट खेळाडू महेश तोरमल यांची क्रिकेट क्षेत्रातील आय एस पी.एल. सामन्यांसाठी निवड

करमाळा : कुंभेज (ता.करमाळा) येथील क्रिकेट खेळाडू महेश तोरमल यांची क्रिकेट क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या आय एस पी.एल. सामन्यांसाठी ग्रीन तिकीट मिळून त्यांची या सामन्यासाठी निवड झाली असून या निवडीचे परिसरातील लोकांमधून स्वागत होत आहे. देशात आयपीएल नंतर आय एस पी एल ही टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोच्च स्पर्धा आहे. ही स्पर्धा ८ संघांमध्ये खेळविली जाते.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना अनेक निवड चाचणी स्तरांतून जावे लागते.पहिल्यांदा खेळाडूंना गोल्डन टिकिट प्राप्त करावे लागते.गोल्डन टिकीट प्राप्त खेळाडूंना नामवंत सेलेक्शन पॅनलच्या कसोटीतून जावे लागते. देशभरातून यंदा ४४ लाख खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यातून फक्त ४५० खेळाडूंना ग्रीन तिकीट देऊन आय एस पी एल च्या अंतिम फेरीत घेतले आहे . महेश तोरमल हे कुंभेज येथील रहिवासी असून ते सध्या विक्रीकर निरीक्षक म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत त्यांची 25 ऑक्टोबर रोजी निवड चाचणी झाली होती त्यांना यामध्ये ग्रीन तिकीट मिळवून त्यांची निवड कायम करण्यात आली आहे.

आता देशभरातील ४५० खेळाडू एकत्र येऊन आपापसात हे सामने खेळतील. महेश तोरमल हे करमाळा तालुक्यातील कुंभेजसारख्या ग्रामीण भागातील खेळाडू असून आज पर्यंत स्थानिक पातळी होणारे अनेक क्रिकेट स्पर्धाचे ते मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत करमाळा तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांच्या निवडीचे विविध स्तरांमधून स्वागत केले जात असून अनेकांनी समक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले आहे.




 
                       
                      