केम येथील ज्ञानेश्वर घाडगे याची एससारपीएफ मध्ये निवड

केम (संजय जाधव) – केम येथील ज्ञानेश्वर सखाराम घाडगे याची खेळाडू कोटयामधुन प्रथम क्रंमाकाने एस.आर.पी.एफ. ग्रुप नं 10 मध्ये निवड झाली.
ज्ञानेश्वरला क्रिडा शिक्षक पवन घोडके, अमोल तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याने मिळविलेल्या या यशाबद्ल मंहत जयंतगिरी महाराज, राहुल क़ोरे, विजय दौड,माजी सरपंच अजितदादा तळेकर, बबलू पाटिल, दादा नवले, पत्रकार संजय जाधव, बाळू गोडसे, माजी सभापती शेखर गाडे यांनी अभिनंदन केले.
आज ज्ञानेश्वर याने मिळविलेले यश पाहण्यासाठी त्यांचे वडिल सखाराम घाडगे हयात असते तर त्यांना फार आनंद झाला असता पण नियती पुढे कोणाचे चालत नाही.
– महंत जयंतगिरी महाराज, श्री उत्तरेश्वर देवस्थान केम



