डॉ. भगवंत पवार यांची राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी निवड
केम (संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील वडशिवणे गावचा सुपूत्र व हैदराबाद येथे एम.बी.बी.एस चे शिक्षण घेत असलेला डाॅ भगवंत पवार याने ऊत्तरप्रदेश येथे झालेल्या लेबल पीडीयाटि्क्स (बालरोग शास्त्र) विषयाच्या प्रश्न मंजुषा स्पर्धेतुन विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची पुढील महिन्यात होणाऱ्या देशपातळीवरील स्पर्धेसाठी देखील निवड झाली आहे.
या स्पर्धा उत्तर प्रदेश मधील कानपूर येथे दि १२ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. या परिक्षेसाठी मध्यप्रदेश, आंधृप्रदेश, तेलागंणा, छत्तीसगड,ऊत्तरप्रदेश या पाच राज्यातील विदयार्थांच्या टिममधून भगवंत ने प्रथम क्रमांक मिळविला आहे. भगवंत हा हैदराबाद येथील एम्स कॉलेजचा विद्यार्थी असून तो तिथे एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे. त्याने मागील महिन्यात तेलंगणा राज्यात झालेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्याची उत्तर प्रदेश येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.
त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल कानपूर येथील मान्यवरांनी त्याचे कौतूक करून शाबासकिची थाप पाठिवरती दिली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तो वडशिवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांचा मुलगा आहे. त्याचे करमाळा तालुक्यातून कौतूक केले जात आहे.
डॉ.भगवंत पवार याची उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी निवड