डॉ.भगवंत पवार याची उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी निवड -

डॉ.भगवंत पवार याची उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी निवड

0

केम (संजय जाधव)  –  वडशिवणे (ता. करमाळा) गावचा सुपुत्र व सध्या हैदराबाद येथील एम्स हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस चे शिक्षण घेत असलेल्या डाॅ.भगवंत पवार याची   उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या विभागीय प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नुकतीच हैदराबाद येथे राज्यस्तरीय  प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली. इंडियन अकॅडमी ऑफ मिडियाटि्क्स  (बालरोग तज्ञ) या विषयावरील ही प्रश्नमंजुषा होती. यात तेलागंणा राज्याच्या विविध मेडिकल काॅलेजचे विदयार्थी सहभागी झाले होते.  एम्स हैद्राबाद काॅलेज तर्फे भगवंत पवार सहभागी झाला होता. त्या प्रश्नमंजुषा या स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळविला व उत्तरप्रदेश येथे  होणाऱ्या विभागीय प्रश्नमंजुषा स्पधेंसाठी निवड झाली आहे. त्याचे वडशिवणे परिसरातून कौतक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!