झरे येथील श्रध्दा पवारची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक ४ व ५ जानेवारी रोजी चंडक प्रशाला सोलापूर येथे संपन्न झाले राज्यस्तरीय निवडीसाठी १३ तालुक्यातून विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले होते. माध्यमिक गटातुन इयत्ता नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे ची ६ वी ची विद्यार्थिनी कु. श्रध्दा तानाजी पवार हिच्या सोलर व्हेइकल ची निवड राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे.
जिल्हा परिषद सोलापूर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख रक्कम, व ट्रॉफी चे वितरण करण्यात आले. या प्रसंगी मा. शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम, उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे उपस्थित होते. आव्हाळे मॅडम यांनी श्रध्दा पवार या दिव्यांग विद्यार्थीनीचे तसेच मार्गदर्शक शिक्षक अक्षय ढेरे सर यांचे अभिनंदन केले तसेच या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री बन्सी आबा घाडगे यांनीही अभिनंदन केले तसेच पुढील राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.