'लीड स्कूल'च्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.. - Saptahik Sandesh

‘लीड स्कूल’च्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :

करमाळा : महात्मा गांधी विद्यालय, करमाळा या ठिकाणी झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सीबीएसई मान्यताप्राप्त लीड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे असून, त्यामध्ये १४ वर्षा खालील वयोगट मुले यामध्ये – 1) इशान शिंदे-प्रथम क्रमांक 2) वृषभ गुगळे-तृतीय क्रमांक मिळवला आहे १७ वर्षाखालील वयोगट मुली यामध्ये – १) प्रचिती चिवटे – तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवीला असुन
वरील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक अंकुश थोरात यांचे मार्गदर्शन मिळाले. जिल्हास्तरावर बुद्धिबळ स्पर्धेत निवड झालेल्या व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे प्रा.बपन सर यांनी केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!