कविटगाव जि.प. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महादेव टकले यांची निवड

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – कविटगाव जि.प. शाळेत प्राथमिक शाळेत दिनांक 22/12/2023 रोजी मा. सरपंच श्री. शिवाजीकाका सरडे* यांच्या अध्यक्षतेखाली आणि *मा. सरपंच श्री. जोतिआबा भोसले* यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2023 ते 2025 या कार्यकाळासाठी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

- या पालक सभेमध्ये सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली ती खालील प्रमाणे.
- अध्यक्ष – श्री. महादेव ( आप्पा ) ऋषिकेश टकले
- उपाध्यक्ष – आसमां साजन शेख
- सदस्य – श्री. कृष्णा हरिदास चिंतामन
- सदस्य – श्री. सुदर्शन अभिमान माने
- सदस्य – श्री. किसन महादेव जगदाळे
- सदस्या – सौ. काजल अण्णासाहेब कांबळे
- सदस्या – सौ. राणी बाळू डुकळे
- शिक्षणप्रेमी सदस्य – श्री. जोतिराम नारायण भोसले
- ग्रामपंचायत प्रतिनिधी – सौ. भाग्यश्री प्रमोद लोणकर
- शिक्षक प्रतिनिधी – श्री. कृष्णा अण्णा जगदाळे
- विद्यार्थी प्रतिनिधी
- 1) स्वराज विजय पाटील
- 2) सिनत अमिन आतार
- सचिव – श्रीम.जयश्री नागनाथ शिंदे

सर्व नवनियुक्त अध्यक्ष , उपाध्यक्ष आणि सदस्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवीटगाव / ग्रामपंचायत कविटगाव यांच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
सर्व नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आणि शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल करण्याचे अभिवचन दिले. सदर पालक सभेसाठी बहुसंख्य पालक उपस्थित होते. त्यामधे सरपंच श्री. शिवाजीकाका सरडे, मा. सरपंच श्री. जोतिआबा भोसले, मा. अध्यक्ष श्री. लक्ष्मण भिमराव जगदाळे संभाजी शिंदे अमिन मुलाणी अण्णासाहेब कांबळे कृष्णा शिंदे दिलीप डुकळे किरण काळे दिलीपबापू शिंदे शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


