चिखलठाण येथील महेशकुमार सरडे यांची कालवा निरीक्षकपदी निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) येथील महेशकुमार मच्छिंद्र सरडे याची जलसंपदा विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत कालवा निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे, सरडे यांनी प्रतिकूल परिस्थितीतून संघर्षमय वाटचाल करत हे यश संपादन केले आहे.
महेशकुमार सरडे हे चिखलठाण येथील रहिवासी असून प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलठाण माध्यमिक शिक्षण रयत संस्थेच्या शिक्षण रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालय चिखलठाण येथे झाले पुणे येथील शेतकी महाविद्यालयातून त्यांनी कृषी विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे, त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी अभिनंदन केले तसेच चिखलठाण परिसरातील विविध क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गावातील मित्रमंडळींनी फटाके वाजवून निवडीचा आनंद व्यक्त केला गेला.