शेलगाव येथील रोहित बेरेची भारतीय सैन्य दलामध्ये निवड

करमाळा : शेलगाव (ता. करमाळा) येथील रोहित शंकर बेरे याची ARO (Army Recruitment Office) च्या भरती परीक्षेतून भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली आहे.

रोहित हा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो सध्या बी.एस्सी. चे तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहेत. रोहितचे वडील शंकर शिवाजी बेरे हे शेतकरी असून त्याच्या आईचे दोन वर्षापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते. या कठीण प्रसंगातून त्याने स्वतः ला सावरत जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. त्याचे चुलते माजी सरपंच प्रमोद शिवाजी बेरे यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत शिक्षणासाठी कायम प्रोत्साहित केल्याचे रोहितने सांगितले.

त्यांच्या निवडीबद्दल शेलगाव येथील संतोष पाटील व मित्रपरिवार यांनी सत्कार करून अभिनंदन केले. तसेच आमदार नारायण पाटील यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थांकडून देखील रोहितचे अभिनंदन करण्यात येत आहे.


