पुणे येथील अफार्म संस्थेच्या कार्यकारी मंडळामध्ये संतोष राऊत यांची निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांची शिखर संस्था ‘अफार्म’ची वार्षिक सर्वसाधारण सभा ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे पार पडली. या सभेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य अशा एकूण ११ जागेसाठी निवडणूक पार पडली, या निवडणूक प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील सदस्य संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. नवीन कार्यकारी मंडळामध्ये करमाळा तालुक्यातील अभिनव भारत समाज सेवा मंडळ, सालसे संस्थेचे अध्यक्ष संतोष राऊत यांची महाराष्ट्रातून सर्वाधिक मताने कार्यकारी संचालक म्हणून निवड करण्यात आली.
या झालेल्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सामाजिक क्षेत्रातील तज्ञ विवेक अत्रे यांनी काम पहिले. नवीन कार्यकारी मंडळामध्ये करमाळा तालुक्यातील अभिनव भारत समाज सेवा मंडळ, सालसे संस्थेचे अध्यक्ष संतोष राऊत यांची महाराष्ट्रातून सर्वाधिक मताने कार्यकारी संचालक म्हणून निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे अध्यक्ष- डॉ. वेंकट मायन्दे माजी कुलगुरू पं.दे.कृ.विद्यापिठ अकोला, उपाध्यक्ष -डॉ. मधुकर गुंबळे, अमरावती कोषाध्यक्ष -डॉ. सुधा कोठारी पुणे, सचिव -श्री. हनुमंत देशमुख बिड, सदस्य – संतोष राऊत -सोलापूर, सदस्य – डॉ. किशोर मोघे – यवतमाळ, सदस्य- श्री.आदिनाथ ओंबळे- सातारा, सदस्य- श्री. शहाजी गडहिरे -सोलापूर, सदस्य – श्रीमती रोहिणी करमुडी -पुणे, सदस्य -श्रीमती गिरिजा गोडबोले -पुणे, सदस्य -श्री. लालासाहेब आगळे -बीड आदी लोकांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंझाडे अध्यक्ष महात्मा फुले समाज सेवा मंडळ, सामाजिक सल्लागार शिरीष कुलकर्णी, अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे सचिव योगेश जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सालगुडे व सर्व स्टाफ, सालसे ग्रामस्थ व महाराष्ट्रातील सामाजिक, राजकिय क्षेत्रातील विविध मान्यवर यांनी अभिनंदन केले.