केम येथील शंभुराजे तळेकर याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

केम (संजय जाधव) – केम येथील कुस्तीपटू शंभूराजे सचिन तळेकर याने लातुर येथे झालेल्या ७० कि.वजन गट कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला व त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शंभूराजे हा धाराशिव येथील व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा विद्यार्थी आहे. त्याला क्रिडा शिक्षक गरड एस ए, व राठोड वस्ताद श्रीनिवास पाथरूड यांचे मार्गदर्शन लाभले त्याने मिळविलेल्या या यशाबद्ल प्रचार्य माने पी,पी यानी तसेच केम येथील माजी सरपंच अजित दादा तळेकर,तंटामुक्ती अध्यक्ष अच्युत काका पाटिल संतोष तळेकर समीर तळेकर मदन तात्या तळेकर शिवाजी तळेकर सतीश खानट श्री हरि भैया तळेकर आवीनाश तळेकर वसंत तळेकर सोपान भाऊ तळेकर आबा मोरे सागर राजे तळेकर यानी अभिनंदन केले त्याचे केम परिसरातून कौतूक केले जात आहे.





