उमरड येथील स्नेहल बदेची जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या अन्वेषकपदी निवड
करमाळा (दि.२) – करमाळा तालुक्यातील उमरड गावची कन्या स्नेहल सुभाष बदे हिची जिल्हा सांख्यिकी कार्यालय येथे अन्वेषकपदी निवड झाली आहे.
सदर परीक्षा महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचनालय विभागा मार्फत घेण्यात आली होती.तिने महिलांच्या ‘इमावा’ प्रवर्गातून हे पद प्राप्त केले आहे. कु. स्नेहल ही नायब तहसीलदार सुभाष बदे यांची कन्या तर उमरडचे पोलीस पाटील अंकुश कोठावळे यांची भाची आहे. तिच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून जिल्हयाची सांख्यिकी विषयक आकडेवारी गोळा केली जाते. उदा. जनगणना, जन्म-मृत्यू नोंदणी पाहणी. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, शासनाच्या विविध योजनांचे मुल्यमापन करणे आदी प्रकारची विविध कामे या विभागाकडून केली जातात.