केम येथील स्वराज्य मर्दानी खेळाच्या आखाडाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – पुणे येथे १४ जानेवारी रोजी पारंपारिक युद्ध कला मर्दानी खेळांच्या खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक मर्दानी खेळ आणि शिवकालीन युद्ध कला जोपासणारे वीस निवडक आखाडे या स्पर्धेसाठी निवडलेले आहेत. यात करमाळा तालुक्यातील केम येथील स्वराज्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था यांची निवड झाली आहे.
संघाचे संघप्रमुख शिवप्रेमी अक्षय दत्तात्रय तळेकर हे आहेत त्यांनी ८ वर्षात शेकडो विद्यार्थी घडवले आहेत . त्यामधले आत्ता या स्पर्धसाठी रिद्धी, संस्कृति, सिद्धी,गौरी, समृद्धी, सोनाली, सौरभ, प्रथमेश, सिद्धी, सानिका, अमृता या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. मर्दानी खेळाच्या स्पर्धेमध्ये लाठी – काठी, तलवारबाजी, दांडपट्टा ,विटा ,गूर्ज, ढाल काठीची लढत, जबर्गंड, बाना इत्यादी शस्त्रांचा समावेश आहे. हा संघ गेले 8 वर्षे झाले अविरत पणे कार्यरत आहे.
या स्पर्धेचे आयोजन तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था पुणे यांनी केले आहे त्यांचे अध्यक्ष रवींद्र जगदाळे सर यांनी हे नियोजन केलेले आहे या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण एनडीटीव्ही स्पोर्ट लाईव्ह ला पूर्ण भारतभर दिसणार आहे