कोंढेज येथील वेदांत व्हटकर याची नवोदय विद्यालयासाठी निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – कोंढेज (ता.करमाळा,जिल्हा सोलापूर) या गावचा रहिवाशी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकटणे (तालुका करमाळा) या शाळेचा विद्यार्थी वेदांत सचिन व्हटकर याची नवोदय विद्यालय पोखरापुर ता मोहोळ या ठिकाणी निवड झाली आहे.

वेदांतने या आधीही पहिली ते पाचवी मध्ये झालेल्या एटीएस,मंथन या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पहिल्या पाच मध्ये क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे. यासाठी त्याला पहिलीपासून वर्गशिक्षक सचिन व्हटकर यांचे मार्गदर्शन लाभले. नवोदय परीक्षेची तयारी करताना त्याला ज्ञानदा अकॅडमी फलटण येथील अविनाश सुतार सर व सुतार मॅडम यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल वरकटणे शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी,गटशिक्षण अधिकारी गट विकास अधिकारी पंचायत समिती करमाळा यांनी वेदांतचे व शाळेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!