करमाळा येथील वेदांत कानडेची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड
करमाळा (दि.११) – करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत उमेश कानडे याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने एस आर पी फ मैदान सोरेगाव (सोलापूर) येथे विविध मैदानी स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये वेदांत कानडे याने गोळाफेक,रनिग,लांब उडी या ॲथलेटिक स्पर्धेत भाग घेतला होता. ॲथलेटिक स्पर्धेत वेदांत ने प्रथम क्रमांक मिळविल्याने त्याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी,पुणे या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत.
राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल वेदांतचे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष जयवंतराव जगताप यांनी त्याचा फेटा हार नारळ देऊन सत्कार केला. यावेळी करमाळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, युवा नेते शंभूराजे जगताप, शाळेचे मुख्याध्यापक बागवान सर, पर्यवेक्षक नवले मॅडम , वर्गशिक्षक रसाळ सर व मार्गदर्शक सचिन दळवी सर,ढेरे सर सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.