भीम आर्मी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विशाल जाधव यांची निवड - Saptahik Sandesh

भीम आर्मी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विशाल जाधव यांची निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – आज (दि.४ जुलै) भीम आर्मी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी करमाळा येथील विशाल अश्रू जाधव यांची तर शहराध्यक्ष पदी शुभम लालबेग यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही निवडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांनी केल्या असून निवडीचे पत्र त्यांना सोलापूर येथे बोलावून देण्यात आले.

यावेळी भीम आर्मी संघटनेच्या शहर अध्यक्षा विशाखा उबाळे,शहर उपाध्यक्ष सुरज गायकवाड,शहर सदस्य आदित्य डोळसे, शहर महासचिव ज्योत्स्ना भालेराव,शहर सचिव मीनाताई कवठेकर,शहर सचिव लक्ष्मीताई माने आदीजन उपस्थित होते.

समाजातील उपेक्षित, पीडित, वंचित यांच्या न्याय हक्कासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार असल्याची प्रतिक्रिया भीम आर्मीचे नूतन तालुकाध्यक्ष विशाल अश्रू जाधव यांनी निवडीनंतर दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!