कोर्टी येथील सतरा वर्षाच्या मुलीला पळविले – पालकाची पोलीसात तक्रार

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : कोर्टी येथील सतरा वर्षाची मुलगी बेपत्ता झाली असून, तिला कोणीतरी अज्ञात कारणावरून पळवून नेले आहे; अशी फिर्याद या मुलीच्या पालकांनी करमाळा पोलीसात दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात दिलेल्या फिर्यादीत मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे, की माझी मुलगी नुकतीच अकरावी पास झाली असून बारावीच्या तासासाठी करमाळा येथील हायस्कुलला येत होती. दररोज सकाळी सातला जावून दुपारी चार वाजता परत कोर्टीला येत असे. परंतू सहा एप्रिलला ती तासाला गेली परंतू परत आलीच नाही. आम्ही अनेक ठिकाणी शोध घेवूनही शोध न लागल्याने तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पळवून नेले आहे. यात अज्ञात व्यक्तीच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

