आवाटी येथील पावणे सतरा वर्षाची मुलगी बेपत्ता..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : आवाटी (ता. करमाळा) येथील पावणेसतरा वर्षाच्या मुलीस ११ एप्रिलला पहाटे बेपत्ता झाली असून कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी फुस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझी पावणे सतरा वर्षाची मुलगी की जीचे आठवी पर्यंत शिक्षण झाले असून तिने सध्या शाळा सोडली आहे. १० एप्रिलला रात्री आम्ही जेवण करून झोपलो होते. ११ एप्रिलला पहाटे पाच वाजता मी उठून माझ्या मुलीस पाहिले असता, ती घरात नव्हती. आम्ही सर्वत्र शोध घेतला परंतू ती सापडली नाही. तिला कोणीतरी अज्ञान व्यक्तीने फुस लावून पळवून नेले आहे.
