पावणेसतरा वर्षाच्या मुलीला फुस लावून पळविले..

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पावणेसतरा वर्षाच्या मुलीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेले आहे. अशी फिर्याद या मुलीच्या वडिलांनी ८ फेब्रुवारीला करमाळा पोलीसात दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझ्या घरी माझी आई व मुलगी ( १६ वर्षे १० महिने) ही होती. मी सकाळी वरकटणे येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीकरीता गेलो होतो. परंतू दुपारी दोन वाजता घरी आलो असता, मुलगी दिसून आली नाही. तिचा सर्वत्र शोध करूनही ती सापडून आली नाही. यावरून तिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले आहे. तिचे शिक्षण दहावी पर्यंत झाले असून अंगात पंजाबी ड्रेस, रंगाने सावळी, अंगाने सडपात, उंची १५५ सें.मी. अशा वर्णनाची ही मुलगी आहे. या प्रकरणी पोलीसांनी पळवून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजीर हे करत आहेत.
