फसवणूक झालेल्या उस वाहतूकदारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – शंभूराजे फरतडे
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – उसतोड मजूर देतो म्हणून फसवणूक केलेल्या उस वाहतूक दार व वाहनमालकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी बोलताना दिला.
शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांच्या नेतृत्वाखाली आज करमाळा तहसील व पोलिस निरीक्षक कार्यालया समोर उसतोड मजूरांकडून फसवणूक झालेल्या वाहतुकदारांचे गुन्हे दाखल करून घ्यावेत या मागणीसाठी युवासनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले या वेळी शंभू फरतडे बोलत होते. अधिक बोलताना फरतडे म्हणाले की तालुक्यातील उस क्षेत्र व कारखाने या मुळे अनेक शेतकऱ्यांच्या अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी विविध बॅंक ,फायनान्स, तसेच सावकारी कर्ज काढून वाहने व उसतोड टोळ्या करून उस वाहतूक व्यवसाय सुरू केला होता मात्र उसतोड मुकादम हे हे पैसे घेऊन देखील कामगार (कोयते) देत नसल्याने अनेक युवक कर्जबाजारी झाले आहेत त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. हा आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात जात असून ज्या वाहतूकदाराकडे नोटरी, चेक, बॅंक व्यवहार तपशील असेल त्यांचे गुन्हे दाखल करून घ्यावेत, विशेष पथक तयार करून याचा सखोल तपास करून पैसे मिळवून देण्यात यावेत अशी अग्रही मागणी केली.
उसवाहतुकदार यांच्या जोरावरच कारखाने सुरू आहेत कारखानदारांकडून यांना उचल देण्यात येते परंतु टोळी न आल्यास व उस पुरवठा न झाल्यास कारखानदारांकडून उस वाहतूकदारांवर गुन्हे दाखल होतात मात्र कारखाना व लोकप्रतिनिधींकडून मात्र उस वाहतूकदारांची कोट्यावधींची फसवणूक होवुन देखील दखल घेतली जात नाही हे दुर्दैव असल्याचे देखील फरतडे यांनी नमूद केले.
ज्यांच्याकडे योग्य ते पुरावे असतील त्यांचे तात्काळ गुन्हे दाखल करून घेतले जातील असे आश्वासन पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दिले. निवेदन तहसीलदार विजयकुमार जाधव व पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी स्विकारले.
यावेळेस शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे , मा.उप तालुकाप्रमुख अॅड विकास जरांडे, श्रीहरी तळेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव शिवसेना शहरप्रमुख प्रवीण कटारिया, तालुका सरचिटणीस पांडुरंग ढाणे, उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, पंकज परदेशी, युवासेना उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, पै आदित्य जाधव युवासेना उप शाखाप्रमुख मयुर तावरे, अनिकेत नवगन, भाऊ मस्तुद, विनोद पाटील, बाळराजे फरतडे, पप्पू निकम, सुरज पुजारी दत्ता डौले ,उसवाहतुकदार चंद्रकांत लबडे-शेटफळ, स्वप्नील गोडगे- सोगाव, बालाजी देवकर- वडशिवणे, गोरख काकडे-टकाळी, येताळ हाके -कावळवाडी, गणेश नरसाळे -मांगी, हरी गुळवे- टाकळी,आदी उपस्थित होते.