भोसे येथील शंकर रामचंद्र सुरवसे यांचे निधन -

भोसे येथील शंकर रामचंद्र सुरवसे यांचे निधन

0


करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१:भोसे (ता. करमाळा) येथील रहिवासी शंकर रामचंद्र सुरवसे (वय ७९) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर भोसे येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्व. सुरवसे हे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक वर्षे कष्टकरी कामगार म्हणून काम करत होते. कष्टकरी, मनमिळावू व प्रामाणिक स्वभावामुळे ते परिसरात परिचित होते. भोसे येथील बापू सुरवसे यांचे वडील तर साडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक निवृत्ती सुरवसे यांचे ते चुलते होते.त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व परिचितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!