१४ लाखाच्या चोरी प्रकरणातील करंजे येथील आरोपी शरद पवार यांना जामीन मंजूर..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा बसस्थानक परिसरातून व्यापाऱ्याची १४ लाख रूपयाची बॅगपळविलेल्या आरोपीला करमाळा न्यायालयातील न्या.आर.ए.शिवरात्री यांनी जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणातील आरोपीवतीने ॲड.अमर शिंगाडे व ॲड.भाग्यश्री मांगले-शिंगाडे यांनी काम पाहिले. फिर्यादीकडून सरकारी वकील ॲड. सचिन लुणावत यांनी काम पाहिले.
या प्रकरणात करमाळा शहरातील सुशिल कात्रेला यांनी फिर्याद दिली होती. यातील आरोपी करंजेचे माजी उपसरपंच शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार अजित उबाळे यांच्याकडे तपास सुरू आहे,. करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून सदर आरोपीला अटक करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी शरद पवार यांना गुरूवारी करमाळा न्यायालयात हजर करण्यात आले त्यानंतर त्यांना ५० हजार रूपयाच्या जामीनावर न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांनी पवार यांची मुक्तता केली आहे. यामध्ये आरोपीकडून ॲड. अमर शिंगाडे व ॲड. भाग्यश्री मांगले-शिंगाडे यांनी काम पाहिले. फिर्यादीकडून सरकारी वकील ॲड. सचिन लुणावत यांनी काम पाहिले.