बेताल वक्तव्य करणाऱ्या अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार

करमाळा(ता.४) : बेताल वक्तव्य करणाऱ्या अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी भाजपचे सोलापूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांनी केली आहे. यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना शशिकांत पवार म्हणाले की, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “औरंगजेबबाबत चुकीचा इतिहास दाखवत आहेत. त्यांनी अनेक मंदिरे बांधली. बनारस मध्ये पंडिताच्या मुली सोबत लग्न करू इच्छिणाऱ्या आपल्या सरदाराला हत्तीच्या पायी दिले. त्यामुळे पंडितांनी तिथे त्यांच्यासाठी मशीद बनवली. औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही, त्यावेळी हिंदू मुस्लिम लढाई नव्हती.ती राज्य निर्माण करण्यासाठी लढाई होती. औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू होते, शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते. औरंगजेबाच्या काळात भारत सधन होता” असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केले. वादग्रस्त करून महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अबू आझमी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
यासंदर्भातील निवेदन आज करमाळा पोलिस स्टेशन ला देण्यात आले. यावेळी भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन,बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आण्णा सुपनर,हिंदू जागरण चे जिल्हा संयोजक संग्राम परदेशी,किसान मोर्चाचे सचिव लक्ष्मण केकान, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश क्षिरसागर,शहर सरचिटणीस जितेश कटारिया,उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.





