शेटफळच्या ओंकार लबडे यांचा नागरी सत्कार-घोड्यावरून गावातून भव्य मिरवणूक

0

करमाळा,ता.२७:  आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ बीच हँडबॉल स्पर्धेत मलदीव येथे भारतीय संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेटफळ (ता. करमाळा) येथील ओंकार लबडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने दिमाखात नागरी सत्कार करण्यात आला.

शेटफळ येथे ओंकार लबडे यांच्या स्वागतासाठी घोड्यावरून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नागनाथ मंदिर परिसरात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी  अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक ॲड. डॉ. बाबुराव हिरडे हे होते.

शेटफळ गावाने विविध क्षेत्रात आपला लौकिक कमावला आहे. शेती,सहकार, सामाजिक यासह खेळाच्या मैदानावरही आता शेटफळची छाप उमटत आहे. ओंकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड होणे व देशाच्यावतीने खेळणे ही बाब केवळ गावाची नाही तर संपूर्ण तालुका व जिल्ह्याचा सन्मान आहे. हीच कामगिरी पुढे अधिक मोठ्या उंचीवर नेण्याची अपेक्षा आहे. या गावाचे नाव आता मोठे झाले आहे. हे मोठेपण टिकवण्याची जबाबदारी आता सर्व ग्रामस्थावर येऊन पडली आहे. ”
ॲड.डॉ.बाबूराव हिरडे,करमाळा.

नूतन हँडबॉल असोसिएशनचे सचिव विनोद गरड यांनी ओंकारचा संघर्षमय प्रवास व त्याची जिद्द यावर प्रकाश टाकला. माजी पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी “यशाने हुरळून न जाता सातत्य राखा,” असा सल्ला दिला. माजी जि.प. उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड यांनी ओंकारचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी अनिल माने, ह.भ.प. राजाभाऊ रोंगे , ह.भ.प. बापू नाईक नवरे , यशवंत कुदळे, माजी गटशिक्षणाधिकारी अनिल बदे यांनी भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र पोलीस नवनाथ नाईकनवरे यांनी केले ,सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी तर आभार  रोहित लबडे यांनी मानले.

यावेळी आदिनाथ चे माजी संचालक सुरेश पोळ, माजी सरपंच मुरलीधर पोळ, विष्णुदास लबडे, तसेच महादेव कांडेकर,कदम सर, अशोक लबडे, विलासअप्पा लबडे,दादासाहेब लबडे तानाजी निंबाळकर, नानासाहेब साळुंखे,अशोक घोगरे, वैभव पोळ,प्रशांत नाईकनवरे ,महावीर निंबाळकर  नामदेव वाघमोडे, प्रताप लोखंडे ,किसन नाईकनवरे,भरत पाटील,पांडुरंग नाईकनवरे,श्रीराम गुंड,आजिनाथ कळसाईत  प्रताप पोळ,आदींसह ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!