शितलदेवी मोहिते-पाटील यांची करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील गावांना भेट

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : माढा लोकसभेचे इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पत्नी शितलदेवी मोहिते-पाटील यांनी नुकतेच करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोंढारचिंचोली, कात्रज, राजुरी, कुंभारगाव, सावडी येथे भेटी दिल्या आहेत. त्यानंतर सायंकाळी मोहिते पाटील समर्थक अमरजित साळुंखे यांच्याही निवासस्थानी त्यांनी भेट देऊन संवाद साधला.
यावेळी दिगंबरराव साळुंखे, डॉ. अमोल घाडगे, अमरजित साळुंखे, डॉ.रोहित साळुंखे, डॉ. स्वाती घाडगे व साळुंखे परीवार यांच्याशी त्यांनी संवाद साधून तालुक्यातील परिस्थिती जाणून घेतली.

भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदार संघात भेट दौरा सुरु केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील व लोकसभा मतदारसंघातील तमाम शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक व समाजसेवक यांच्याकडून मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याला न्याय देण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत पुर्ण ताकतीने उतरावे अशी भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान नागरिकांकडून त्यांची मते जाणून घेतली जात असल्याचे सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांनी बोलताना सांगितले आहे.


