प्रा.महेश निकत यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : संगमनेर येथील संजीवनी फाउंडेशन यांच्यावतीने देण्यात येणारा “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार” यंदा करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा. महेश निकत यांना 2 मार्च रोजी संगमनेर येथे देण्यात आला.
सन्मान निष्ठेचा, गौरव कर्तुत्वाचा याप्रमाणे नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे , शिक्षण महर्षी लक्षणरावजी पठाडे,,राज्य सहकारी साखर कारखाना चे विद्यमान संचालक विवेक कोल्हे कोपरगाव, रोहित वाघचौरे साहेब तसेच फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत मानपत्र, गौरवचिन्ह, सन्मानचिन्ह, महावस्त्र, गौरव पदक देऊन हा सन्मान संगमनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
पुरस्कार प्रेरणा देतात ; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते ! या विचारसूत्रावर आयोजित केलेल्या संजीवनी फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या गुणीजन गौरव पुरस्कारामुळे पुढील कार्यात सर्व करमाळा तालुक्यातील विद्यार्थी पालक व इतर सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या सर्वच लोकांना घेऊन पुढील काळात आणखी खूप चांगले कार्य करत राहणार आहे असे प्रा निकत यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रा.निकत यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यानंतर त्यांचे तालुक्यातुन विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.