शिवजयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करण्याची गरज : प्रा.विष्णु शिंदे

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : शिवजयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. विष्णु शिंदे यांनी दहीगाव (शेळके वस्ती )तालुका करमाळा येथे आयोजित शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलताना केले. येथील जिल्हा परिषद शेळके वस्ती शाळेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मोजक्या मावळ्यांच्या जीवावर स्वराज्य निर्माण करू शकले कारण लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांचा स्वतःप्रती आसणारा आत्मविश्वास याच्या जोरावर त्यांनी रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण केले. त्यांच्या कार्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्याची गरज गरज असून सध्याच्या काळात प् वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षचे गड किल्ले सर करून उत्तुंग यश मिळवण्याची गरज आहे.

शिवजयंतीसारखे उत्सव डी .जे तालावर नाचून साजरे करण्यापेक्षा वेगवेगळी वाचून साजरे केले पाहिजे यावेळी पंचायत समिती सदस्य नितीन तकिक सरपंच संजय गलांडे, दहिगाव सोसायटीचे चेअरमन हरिश्चंद् शेळके प्रा. जयेश पवार , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जोतीराम पाडूळे, लक्ष्मण वाघमोडे , महेश बापू शेळके दिलीप शेळके संतोष गिरमकर ,महावीर निंबाळकर बाबूराव जाधव गंभीरे मॅडम , अंगणवाडी सेविका मोटे ताई पोलीस पाटील ज्येष्ठ शिक्षक दस्तगीर शेख यांच्यासह ग्रामस्थ पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

