ठिबक व पिकविम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत – शिवसेनेने दिला आंदोलनाचा ईशारा
केम (संजय जाधव) – कृषी सिंचन योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून `प्रति थेंब अधिक पीक ʼ घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना राबविण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान दिले नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकुन पडले आहेत. त्याचबरोबर पीकविम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत.
३१ ऑगस्ट पर्यंत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन करमाळा कृषी कार्यालयासमोर सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदना द्वारे दिला आहे.
शिवसेनेकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ८० % अनुदानावर ठिबक व तुषार संच पुरवले जात असल्याने अनेक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करत असतात. ‘महा डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड केली जाते. निवड झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया होते. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या योजनेच्या अनुदानाला ‘ब्रेक’ लागला आहे. अनुदान जमा न झाल्याने ठिबक संच विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना तगादा लावला जात आहे जुळवाजुळव करून काही शेतकऱ्यांनी दुकानदाराची देणी भागविली आहेत तर काही ठिबक सिंचन विक्रेते देखील अडचणीत आले आहेत.
त्याचबरोबर डिबीटी योजनेअंतर्गत भेटणाऱ्या शेती औजरांचे देखील अनुदान रखडले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिकविमच्याचे देखील अजून वाटप केले गेले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर उपतालुकाप्रमुख विजय माने ,युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे ,युवतीसेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे ,विभाग प्रमुख बालाजी वाडेकर, भाऊ मस्तुद महेश काळे पाटील यांच्या सह्या आहेत.
सरकारी पैशातून मते विकत घेण्याचा डाव!
अतिवृष्टी, पीक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, नमो योजनांचा बट्याबोळ उडाला आहे.खतांची टंचाई आहे ,विद्यार्थ्यांना गणवेश, बुटा विनाच राष्ट्रीय सण साजरा करावा लागला आहे सरकार मात्र सरकारी नवीन लाडकी बहीण योजना आणून सरकारी पैशातून मते विकत घेण्याचा डाव करत आहे.या निवडणुकीत शेतकरी ,बेरोजगार युवक, विद्यार्थी यांना जागा दाखवून देतील.–शाहुदादा फरतडे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना (ठाकरे गट)
शेतकऱ्यांच्या अनुदान प्रश्नावर वरिष्ठांकडे वारवंवार पाठपुरवा सुरू आहे. बहुतांश जिल्ह्यातील अनुदान रखडलेले आहे.लवकरच अनुदान जमा होईल. पीकविम्याचा सर्व प्रस्ताव दिलेला आहे त्याचे देखील पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.
– संजय वाकडे तालुका कृषी अधिकारी
या प्रशालेत विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते. आमदार महेश दादा लांडगे यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत गायकवाड यांचे तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी या सर्वांना छत्र्यांचे वाटप केले. प्रत्येक विद्यार्थ्याला छत्री मिळाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याद्यापक नानासाहेब आढाव यांनी उद्धव गायकवाड यांचे आभार मानले. यावेळी छत्री भेट मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. ध्वजावंदनाच्या कार्यक्रमासाठी कुंभारगाव व परिसरातील घरतवाडी, देलवडी व माळीवस्तीवरील पालक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून घरतवाडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उद्धव गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.