ऊत्तरेश्वर मंदिरात शिवलिंगास भाताची लेपन आरास

केम (संजय जाधव): केम येथील जागृत देवस्थान श्री ऊत्तरेश्वर बाबांच्या शिवलिंगास श्रावण मासानिमित्त भाताची लेपण आरास करण्यात आली. मंदिराचे पुजारी कृष्णा गुरव, भैय्या मोकाशी आणि तात्या गुरव यांनी ही आरास साकारली.

मंदिरात दर सोमवारी शिवलिंगाची वेगवेगळ्या प्रकारे सजावट केली जाते. सध्या श्रावण मास सुरू असल्याने भाविकांच्या उपस्थितीत भाताचे लेपन करून विशेष आरास करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

उत्तरेश्वराच्या मंदिरात भाविक नवस बोलतात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर श्रींच्या शिवलिंगास अभिषेक करून किंवा भाताची आरास साकारून नवस फेडतात. बहुतेक नवस श्रावण मासात पूर्ण केले जातात.




