ऊत्तरेश्वर मंदिरात शंकररूपात शिवलिंगाची आरास

केम (संजय जाधव) – केम येथील जागृत देवस्थान श्री ऊत्तरेश्वर बाबांच्या शिवलिंगाची श्रावणी तिसऱ्या सोमवारी शंकराच्या रूपातील आकर्षक सजावट व आरास करण्यात आली. मंदिराचे पुजारी कृष्णा गुरव यांनी ही आरास साकारली.

दर सोमवारी या मंदिरात विविध रूपात शिवलिंगाची सजावट केली जाते. आज तिसरा सोमवार असल्याने शंकररूपातील विशेष आरास फुलांनी व अलंकारांनी सजवण्यात आली. श्रावणी सोमवारचे औचित्य साधून श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

मंदिरातील नियमित भाविक भालचंद्र गुटाळ (कुंकू कारखानदार, केम) यांनी सांगितले की, “दर सोमवारी पुजारी कृष्णा गुरव यांच्या हस्ते होणारी विविध रूपातील पूजा व आरास भाविकांच्या मनाला आनंद देते.”



