सोमवती अमावास्या निमित्त शिवलिंगास खंडेरायाची आकर्षक आरास

केम(संजय जाधव): केम येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिरात सोमवती अमावास्या निमित्त शिवलिंगास खंडेरायाची आकर्षक आरास करण्यात आली. ही आरास मंदिराचे पुजारी समाधान गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सजवली.

या मंदिरात दर सोमवारी शिवलिंगाची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. यंदा सोमवारी सोमवती अमावास्या असल्याने खंडेरायाच्या स्वरूपात शिवलिंगाची आरास करण्यात आली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी ही पूजा व आरास पाहून समाधान व्यक्त केले.
“दर सोमवारी मंदिरात पुजारी समाधान गुरव शिवलिंगाची वेगवेगळी रूपे साकारतात. आज खंडेरायाच्या रूपातील आरास पाहून मन प्रसन्न झाले,”
— राहुल आबा कोरे, केम






