श्री उत्तरेश्वर देवस्थानचे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न-शिवलिंगास तिरंग्याची सजावट

केम(संजय जाधव):येथील श्री उत्तरेश्वर मंदिरात २६जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला या देवस्थानचे ध्वजारोहण चेअरमन दादासाहेब गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी जि,प,प्राथमिक शाळेतील विदयार्थानी राष्टगीत व झेंडागीत गायले या कार्यक्रमासाठी सरपंच सारिका कोरे शिवसेना महिला आघाडि ता प्रमुख वर्षा चव्हाण मनोज सोलापूरे, भाऊसिहेब बिचितकर, मोहन दौड,विजय तळेकर, रंदवे गुरूजी राहुल कोरे संजय दौड, बाळु ननवरे, पत्रकार संजय जाधव, बाळासाहेब गुरव, राजेंद्र दोंड, ज्ञानदेव तळेकर, भैरू शिंदे, बाळू गोडसे उपस्थित होते.

तसेच या निमित्त श्री उत्तरेश्वर देवस्थान शिवलिंगास सुंदर असी तिरंगा सजावट करण्यात आली हि सजावट मंदिराचे पुजारी समाधान गुरव यांनी केली. त्यांना शंकर देवकर गलांडे यांची मदत मिळाली. या सजावटिसाठी हिरवी,पांढरी, तांबडया रंगाची रांगोळीने तिरंगा ची आरास करण्यात आली
हि सजावट ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होती या सजावटिचे ग्रामस्थानी कौतूक केले.







