श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

केम(संजय जाधव) : ‘महात्मा फुले शिक्षण व समाज विकास मंडळ, केम’ संचलित श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व राजाभाऊ तळेकर विद्यालयामध्ये काल वार्षिक स्नेहसंमेलन उत्सवामध्ये पार पडले. स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळाचे चे अध्यक्ष मा. श्री गणेश (भाऊ) करे पाटील आणि जनता सहकारी बँक चे अध्यक्ष दिलीप (दादा) तळेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री महेश तळेकर (सर) होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ या अभियानात करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल करे पाटील यांनी शाळेचे कौतुक केले आणि गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध रीलस्टार श्री गणेश नेमाणे हे देखील उपस्थित होते, केम गावचे सरपंच सौ सारिका कोरे, माजी पंचायत समिती सदस्य शेखर (तात्या) गाडे, उपसरपंच सागर कुरडे, ए पी ग्रुपचे अध्यक्ष अजित (काका) पाटील, केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे सर, महावीर (आबा) तळेकर, सागर (राजे) तळेकर, पै. मदन (तात्या) तळेकर, सागरराजे दोंड, श्री वसंत तळेकर (सर), गणेश तळेकर, विकास कळसाईत, संदीप तळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनात विविध प्रकारच्या गीतांचा देशभक्तीपर, कोळीगीत, लोकगीत, कलाअभिनय, भक्ती गीते, शौर्य गीते, लावणी, विनोदी गीते इत्यादी कलाविष्कार विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांसमोर सादर केला. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केम आणि परिसरातील असंख्य नागरिक सदर कार्यक्रमास उपस्थित होते. ‘राष्ट्रीय एकात्मता’ वर आधारित चिमुकल्यांनी सादर केलेल्या नाटीकेने सामाजिक एकतेचा संदेश दिला.
शिवम सरवदे यांच्या उत्कृष्ट अशा ‘शिवम साऊंड सिस्टिम’ने कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिवानी मंडप केम चे श्री कुंडलिक तळेकर यांनी उत्कृष्ट मंडप व्यवस्था पुरविली. श्री जावेद मुलाणी यांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग करून स्क्रीन द्वारे कार्यक्रम पाहण्याची सोय केली
याप्रसंगी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज तळेकर (सर) , श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री नागनाथ तळेकर (सर) आणि संस्थेचे अध्यक्ष श्री महेश तळेकर सर यांचा मा. श्री सागर राजे तळेकर व सुयश क्लासेस चे संचालक श्री वसंत तळेकर सर यांनी नागरी सत्कार केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यी आणि पालक इ. नी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध असे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ माधुरी तळेकर मॅडम, सौ स्वाती कांबळे मॅडम व त्याचे सौ आशा माळी मॅडम यांनी केले.उपस्थितांचे आभार श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री नागनाथ तळेकर (सर) यांनी मानले





