जिल्हास्तरीय २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत YCM चा सिद्धार्थ मंजुळे प्रथम
करमाळा (दि.६) – करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालया मधील इयत्ता ११ वी सायन्स मधील विद्यार्थी सिद्धार्थ मंजुळे याने जिल्हास्तरीय २०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून त्याची पुणे येथे होणाऱ्या विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद मार्फत शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा एस. आर. पी. एफ, दहा नंबर, सोरेगाव, जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यामधील ११ तालुक्यातून विजयी झालेले विविध खेळातील विविध खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील खेळाडू सिद्धार्थ मंजुळे हा २०० मीटर धावणे या खेलबाबी मध्ये करमाळा तालुक्यामधून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. आज झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धच्या २०० मीटर धावणे मध्ये त्याने जिल्हास्तरावर विजय प्राप्त करून त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. सिध्दार्थला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.रामकुमार काळे व अंकुश थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.