नवभारत इंग्लिश स्कूलची सिद्धी देशमुख राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र

करमाळा : श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल आणि ट्विंकलिंग स्टार्स, करमाळा येथील इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी सिद्धी देशमुख हिने महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत पाचवी क्रमांकाची रँक मिळवली आहे.

या उल्लेखनीय यशामुळे सिद्धीची राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
संस्थेच्या वतीने अध्यक्ष कन्हैयालाल देवी, शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी, मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर, क्रीडा शिक्षक नागनाथ बोळगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी सिद्धीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.





